Central Railway: गर्दीने हैराण झालेल्या कर्जत-खोपोलीकरांना मोठा दिलासा! 15 डब्यांच्या लोकल सेवा सुरू, प्रवास अधिक सुखकर

कर्जत आणि खोकर्जत आणि खोपोली परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Central Railway: गर्दीने हैराण झालेल्या कर्जत-खोपोलीकरांना मोठा दिलासा! 15 डब्यांच्या लोकल सेवा सुरू, प्रवास अधिक सुखकर

मुंबई : कर्जत, खोपोली आणि मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागातील निवडक लोकल फेऱ्या 12 डब्यांऐवजी 15 डब्यांच्या रेकसह सुरू केल्या आहेत. 15 ऑगस्ट 2026 पासून या वाढीव डब्यांच्या लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

या निर्णयामुळे कर्जत आणि खोपोली परिसरातून मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची प्रवासी क्षमता वाढली आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, अतिरिक्त तीन डब्यांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल 15 डब्यांच्या

कर्जतहून खोपोलीकडे जाणाऱ्या सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी, दुपारी 12 वाजता आणि दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल आता 15 डब्यांच्या आहेत.

त्याचप्रमाणे खोपोलीहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या सकाळी 10 वाजता, 11 वाजून 20 मिनिटांनी आणि दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल सेवाही 15 डब्यांच्या करण्यात आल्या आहेत.

कर्जत-CSMT मार्गावरही वाढले डबे

कर्जतहून CSMTच्या दिशेने जाणाऱ्या दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी, सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी, सायंकाळी 7 वाजून 34 मिनिटांनी आणि रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल आता 15 डब्यांच्या रेकसह धावत आहेत.

तर CSMTहून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या सकाळी 9 वाजून 57 मिनिटांनी, दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी आणि सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल सेवांचाही 15 डब्यांच्या सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा

लोकलच्या डब्यांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येक फेरीत अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कर्जत, खोपोली आणि आसपासच्या भागातून मुंबईकडे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

दररोजच्या प्रवासात गर्दीचा सामना करणाऱ्या चाकरमान्यांसाठी 15 डब्यांच्या लोकल सेवा महत्त्वाच्या ठरणार आहेत. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत प्रवाशांची संख्या मोठी असते. अशा वेळी वाढीव डब्यांमुळे लोकलची क्षमता वाढणार आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कर्जत-खोपोली मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील काळात आणखी लोकल फेऱ्यांचा विस्तार होणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number