बॉलीवूडची गॉसिप क्विन कंगना रानौत सोशल मीडियावर बेधडकपणे आपली मते मांडत असते. पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियाच्या सहाय्याने तिने संताप व्यक्त केला आहे. आता कंगनाच्या नजरेला आयपीएलमधील काहीतरी खटकलं आहे तर तिनं त्यावरही प्रतिक्रिया देताना मागे पुढे पाहिलेलं नाही.
अभिनेत्री कंगनाला नुकतंच रॉयल चॅलेंजर्स बेंगुळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या आयपीएल मॅच दरम्यान एक पोस्टर दिसलाय. विशेष म्हणजे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे ती निराशा व्यक्त करत आहे.
मासूम बच्चों को ये बेहूदा बातें ना सीखायें, इससे आप मॉडर्न या कूल नहीं अश्लील और फूल लगते हो। https://t.co/dGC7OmOPvM — Kangana Ranaut (@KanganaTeam) April 20, 2023
यात पोस्टमध्ये ऑडिन्समध्ये एक मुलगा त्याच्या हातात एक प्लेकार्ड घेऊन उभा आहे. या प्लेकार्डमध्ये मुलानं विराट कोहलीला एक विनंती केलीय. ज्यात लिहिलंय,’हाय विराट अंकल, मी वमिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’ . आता हीच गोष्ट कंगनाच्या नजरेत आली आणि तिला ती खटकली. तिनं ट्वीटरवर त्या प्लेकार्ड हातात पकडलेल्या मुलाच्या पालकांवर निशाणा साधला आहे. कंगना म्हणाली,”लहान मुलांना हे असं नको ते कशाला शिकवता. हे सगळं करून तुम्ही मॉर्डन किंवा कूल नाही तर अश्लील आणि फूल दिसता”.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.