जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे.
कमला मिल्समध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम आणि नियमबाह्य व्यवस्थापन असणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.