Central Railway: मध्य रेल्वे विस्कळीत; ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे लोकल वाहतुकीला ब्रेक, प्रवाशांची मोठी गैरसोय

कल्याण आणि शहाड रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Central Railway: मध्य रेल्वे विस्कळीत; ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे लोकल वाहतुकीला ब्रेक, प्रवाशांची मोठी गैरसोय

कल्याण : कल्याण आणि शहाड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडाचा परिणाम प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील लोकल वाहतुकीवर झाला असून, काही काळासाठी या मार्गावरील लोकल गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

डोंबिवलीहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील वाहतूक प्रभावित झाल्याने अनेक प्रवाशांना स्थानकातच थांबावे लागले. काही लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्याने प्रवाशांचा गोंधळ वाढला असून, आपल्या इच्छित स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

दरम्यान, परिसरात पावसाचे वातावरण असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुलाचा एक मार्ग दोरखंड लावून बंद करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांकडून अर्थात GRPकडून प्रवाशांना दुसऱ्या पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ओव्हरहेड वायरमध्ये उच्च विद्युतदाब असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील लोकल काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी ओव्हरहेड वायर किंवा रेल्वेच्या विद्युत उपकरणांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number