कल्याणच्या कोळशेवाडीत परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात चार अल्पवयीन मुलींना जोर जबरदस्तीने घरात डांबून ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. बेपत्ता असलेल्या एका मुलीने आईला मदतीचा मेसेज पाठवत स्वतःचे लाईव्ह लोकेशन शेअर केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चेतन माने नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चेतनवर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण कोळशेवाडी परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होती. अचानक मुलीच्या मोबाईलवरून तिच्या आईला मेसेज ज्यात मुलीने म्हटलं होत की, चेतन नावाच्या मुलाने मला मारहाण करत असून एका घरात डांबून ठेवले आहे. त्याच्या तावडीतून ती सुटली असून एका इमारतीखाली लपल्याचं सांगितलं. यानंतर आईने
बेपत्ता मुलीने आईला मेसेज आणि लाईव्ह लोकेशन शेअर केल्याने समोर आला संपूर्ण प्रकार 112 वर कॉल करत पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलींची सुटका केली असून चेतन माने नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तसेच संबंधित मुलीसह आणखी तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली. या आरोपीने या चार अल्पवयीन मुलींना नेमकं का डांबून ठेवलं होतं? त्यांच्यावर कोणताही अत्याचार झाला आहे का? याचा कोळशेवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करत सखोल तपास सुरू आहे.