जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
डोंबिवलीतील मानपाडाजवळ 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं सूरज म्हात्रेला बेदम मारहाण केलीय. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. एका प्रकरणातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सूरज म्हात्रेला ही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूरज आपल्या भावासोबत असातांना 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं सूरजला मारहाण केली. यावेळी भावासोबत असलेल्या मित्रांनी तेथून पळ काढला. मात्र, सूरज म्हात्रे या टोळीत सापडला आणि त्याला मारहाण करण्यात आली.