काळुंद्रे नदीला पूर, चारचाकी बुडाली 

पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे.
काळुंद्रे नदीला पूर, चारचाकी बुडाली 

२५ जुलै, २०२४ पनवेल : पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे. भिंगारी – नांदगाव मार्गावर काळुंद्रे नदीवरील पुलावर पुराच्या पाण्यात एक चारचाकी अडकल्याची घटना घडली. या पुलावरून वाहनचालक नियमित प्रवास करतो. मात्र, गुरुवारी सकाळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या मधोमध ही चारचाकी अडकली. सुदैवाने चालकाने चारचाकीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, भींगारी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चारचाकी बाहेर काढली.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version