‘कालनिर्णय’ पन्नास वर्षांचा वारसा

50 वर्षांहून अधिक काळापासून कालनिर्णय मराठी माणसावरच नव्हे, तर भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा नक्कीच उमटवला आहे.

‘कालनिर्णय’ पन्नास वर्षांचा वारसा

मुंबई : महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात कालनिर्णयची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले कालनिर्णय हे सुमंगल प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी-नक्षत्रे, शास्त्रार्थ ही कालनिर्णयची प्रमुख अंगे असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ करण्याचा सांस्कृतिक रिफॉर्म कालनिर्णयने पन्नास वर्षांपूर्वीच केला.

समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून, वेगवेगळ्या धाटणीचा ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार छान छोटे कालनिर्णय, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, नोटपॅड, स्वादिष्ट, आरोग्य, मोठे ऑफिस (मराठी, इंग्रजी), छोटे ऑफिस (मराठी, इंग्रजी), मीडिअम, टु इन वन क्युबिकल, कार (मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी), डेस्क (मराठी, इंग्रजी),  अॅकॉर्डियन, मिनी, मायक्रो, वर्षचंद्रिका, मंथली प्लॅनर, पॉकेट डायरी, एटीएम कार्ड होल्डर, इयर प्लॅनर व नोंदणी अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. यंदा कालनिर्णयने मॅग्नेट, स्लीम विकली नोट प्लॅनर तसेच मोठे ऑफिस हिंदी व गुजराती या खास आवृत्त्याही आणल्या आहेत. देशातील पहिली वेबसाइट, अॅप अशा उपक्रमांद्वारे कालनिर्णय नेहमीच काळाबरोबर चालत आले आहे.

विविध उपक्रमांद्वारे 50 वर्षांहून अधिक काळापासून कालनिर्णय मराठी माणसावरच नव्हे, तर भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा नक्कीच उमटवला आहे. कालनिर्णय हे जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन आहे हे आपणास ज्ञात आहेच आणि हा बहुमान कालनिर्णयला ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ABC) या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. कालनिर्णयने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत व भविष्यातही असाच प्रयत्न राहील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number