न्यायमूर्ती रंजन गोगई यांनी आज 46 व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे.
रंजन गोगई हे सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश आहेत, न्या. गोगोई हे 28 फेब्रुवारी 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 मध्ये ते पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.
2017 साली सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायधीशांनी केलेल्या बंडात न्या. गोगोई यांचा समावेश होता, त्यावेळी 5 न्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले होते