Junnar Crime: जुन्नर प्रकरणात मोठी अपडेट! चिमुकलीवरील अत्याचार-हत्येच्या आरोपीचा फोटो समोर; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

जुन्नरच्या पिंपळवंडी येथील 9 वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूच्या प्रकरणात आरोपीचा फोटो समोर आला आहे. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला.

Junnar Crime: जुन्नर प्रकरणात मोठी अपडेट! चिमुकलीवरील अत्याचार-हत्येच्या आरोपीचा फोटो समोर; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात 9 वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा फोटो समोर आला असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयिताचे नाव साहिल खैरे असल्याचे समोर आले आहे. तो काही काळ आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. याच परिसरात पीडित चिमुकली राहत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे, संबंधित व्यक्तींची चौकशी आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, अशी माहिती दिली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number