जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सोशल मिडीयावर, देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरुवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
तसं निवेदनही त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलं आहे. देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुकवर पेजवर भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या मथळ्याखाली एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अवधूत प्रकाशराव शिंदे यानं ही पोस्ट केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.