टोकियो: जपानमधून मोठी बातमी समोर येत आहे. जपानचे चंद्र मिशन अयशस्वी झालं असून शुक्रवारी चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात खाजगी जपानी लँडर क्रॅश झाला. टोकियोस्थित आयस्पेस कंपनीने लँडरशी संपर्क तुटल्यानंतर काही तासांनी मिशन अयशस्वी झाल्याचे घोषित केले. लाँच कंट्रोलर्सनी लँडरशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणताही संदेश मिळाला नाही.
हेही वाचा – व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामला टक्कर देण्यासाठी एलोन मस्क यांनी लाँच केले XChat; काय आहेत खास?
जपानचा चंद्रावर पोहोचण्याचा दुसरा प्रयत्नही फसला –
दरम्यान, चंद्रावर उतरण्याचा जपानचा दुसरा प्रयत्नही फसला आहे. प्राप्त माहितीनुसार, मिनी रोव्हरसह अंतराळयान चंद्रावर उतरण्यापूर्वी दोन मिनिटे आधी संपर्क तुटला होता. आयस्पेसचे सीईओ आणि संस्थापक ताकेशी हाकामाडा यांनी मिशनमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांची माफी मागितली. आयस्पेसचे हे दुसरे चंद्र मिशन होते. दोन वर्षांपूर्वी कंपनीने चंद्रावर पोहोचण्याचा पहिला प्रयत्न केला होता. मात्र, त्यात कंपनीला यश आले नव्हते. यंदाच्या लँडरला 'रेझिलियन्स' असे नाव देण्यात आले होते.
हेही वाचा – स्पेसएक्सच्या 'Starship' रॉकेटचे प्रक्षेपण पुन्हा अयशस्वी; अंतराळयानाचे झाले तुकडे
तथापि, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही मोहिमा एकाच समस्येमुळे अयशस्वी झाल्या की नाही हे लगेच सांगणे कठीण आहे. रेझिलियन्स लँडरसोबत चंद्राची धूळ गोळा करण्यासाठी फावडे असलेला एक छोटा रोव्हर पाठवण्यात आला होता. सध्या टीम शेवटच्या क्षणी लँडरमध्ये काय चूक झाली याचा तपास करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.