Thane Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी शिंदेंची नवी चाल; रवींद्र फाटक यांचा पत्ता कट क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Thane Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी शिंदेंची नवी चाल; रवींद्र फाटक यांचा पत्ता कट क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 विधान परिषद जागासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच आगामी ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचे पाहायला मिळात आहे.

ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्का तंत्र वापरण्याची चर्चा सुरु असून एकनाथ शिंदे यांचा बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी उमेदवार म्हणून बविआचे क्षितीज ठाकूर यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकूर पिता-पुत्रांना प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं; महायुतीत रस्सीखेच

हितेंद्र ठाकूरांची बविआ शिवसेनेत विलीन होणार?
या प्रस्तावानंतर विलीनीकरणासाठी एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर ह्यांच्यात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ठाणे-पालघर विधानपरिषदेच्या पार्श्वभुमीवर एकनाथ शिंद नवी चाल खेळत असल्याचे म्हटलं जात आहे. प्रहारनंतर बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची विश्वासनिय सुत्रांची माहिती आहे. 

हितेंद्र ठाकूर ह्यांच्या बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार पट्ट्यात दबदबा आहे. तसेच बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत, त्यामुळे जर बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने शिंदेंना मिळाला तर आगीमी विधान परिषद निवडणुकांसाठी शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो. बहुजन आघाडी देखील शिवसेना शिंदे गटात सामील करून घेणार का? या चर्चांना आता उधाण आलं असून विलीनीकरण झाल्यास रवींद्र फाटक ह्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत 4 जूनपर्यंत असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number