Iran Israel US War:तेहरानमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला, खामेनेईनंतर इराणचा दुसरा मोठा नेता ठार?

तथापि, इराणने नेतृत्वाच्या सातत्यासाठी एक विशेष व्यवस्था ठेवली आहे. त्यानुसार कोणत्याही महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लगेचच उत्तराधिकारी जाहीर करता येईल.

Iran Israel US War:तेहरानमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला, खामेनेईनंतर इराणचा दुसरा मोठा नेता ठार?

तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अशातच इस्रायलने आता इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते मानले जाणारे अली लारीजानी यांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. आज मंगळवारी, 17 मार्च 2026 रोजी इस्रायलने तेहरानमधील लारीजानी यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे. मात्र या हल्ल्यात लारीजानी ठार झाले की नाही, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आला. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लष्करी हालचाली आणि धोरणात्मक निर्णयांचे समन्वय करण्याची जबाबदारी लारीजानी यांच्याकडे होती. ते सध्या इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश होताच इस्रायलने लारीजानी यांना लक्ष्य केल्याचे ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्सने आणखी एक मोठा दावा केला आहे. इराणच्या बसीज फोर्सचे प्रमुख गुलाम रजा सुलेमानी यांना ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. बसीज फोर्स ही इराणमधील सर्वात मोठ्या अर्धसैनिक संघटनांपैकी एक मानली जाते. खामेनेई यांच्या हत्येनंतर देशातील महत्त्वाचे निर्णय लारीजानी घेत असल्याचेही सांगितले जात आहे, कारण सध्याचे नवीन सर्वोच्च नेते जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

अली लारीजानी हे अयातुल्ला अली खामेनेई यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. जून 2025 मध्ये खामेनेई यांनी त्यांची सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या सचिवपदी नियुक्ती केली होती. अमेरिकेच्या सेंटकॉम कमांडने अलीकडेच लारीजानी यांचे नाव ‘हिटलिस्ट’मध्ये समाविष्ट केले होते. तसेच त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणाही अमेरिकेकडून करण्यात आली होती.

हेही वाचा: MPs Suspension Revoked: विरोधी पक्षांना मोठा दिलासा; 8 खासदारांचे निलंबन अखेर मागे

युद्धाच्या पार्श्वभूमीवर लारीजानी यांनी सोमवारी (16 मार्च 2026) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी इराणच्या वतीने सर्व मुस्लिम देशांना पत्र लिहिल्याचे सांगितले होते. त्या पत्रात त्यांनी यहुदी आणि ख्रिश्चन समुदायाविरोधात संघर्षाची भाषा वापरली असल्याचेही सांगितले जाते. तसेच इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

लारीजानी यांनी इराणमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आला नव्हता. तरीही इराणमधील कट्टरपंथी आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.

दरम्यान, 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या पहिल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्या दिवसापासून आतापर्यंत अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह इराणचे सुमारे 40 वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायल मोठ्या नेत्यांना लक्ष्य करून ‘टार्गेट किलिंग’च्या रणनीतीचा वापर करत असल्याचे सांगितले जाते.

तथापि, इराणने नेतृत्वाच्या सातत्यासाठी एक विशेष व्यवस्था ठेवली आहे. त्यानुसार कोणत्याही महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लगेचच उत्तराधिकारी जाहीर करता येईल. प्रत्येक महत्त्वाच्या पदासाठी आधीच चार संभाव्य उत्तराधिकाऱ्यांची यादी तयार ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठे नेते गमावूनही इराणची सत्ताकारण व्यवस्था कार्यरत राहू शकते.

हेही वाचा: Divyanka Tripathi Pregnancy : लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांका आणि विवेकच्या घरी पाळणा हलणार? चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number