मज्जाच और आहे. हे दोन संघ अनेकदा आयपीएलच्या फायनलमध्ये भिडलेआहेत. या दोन संघांमध्ये अनेक चांगले सामने झाले. चाहते या सामन्याची आवर्जून वाट बघतात. गेल्या 5 सामन्यात जेव्हा जेव्हा हे संघ एकमेकांसमोर आले आहेत त्यातले चार सामने सीएसकेने जिंकले, तर एक मुंबईने. आजचा म्हणजे 23 एप्रिल 2026 चा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
हेही वाचा – IPL 2026 | IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? 'या' एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही
आयपीएल 2026 मध्ये मुंबई आणि चेन्नई दोघांचा संघर्ष सुरू आहे. चांगले संघ असूनदेखील सामने जिंकण्यात असमर्थ ठरले आहेत. मुंबईने पहिल्या सामन्यानंतर चार सामने गमावले, तर चेन्नई फक्त दोन सामने जिंकू शकले आहेत. मुंबई सातव्या क्रमांकावर आहे तर चेन्नई आठव्या. मुंबई जिंकली तर पाचव्या क्रमांकावर पोहोचेल तर चेन्नई जिंकले तर सहाव्या क्रमांकावर. मुंबईने गुजरातबरोबरचा सामना जिंकून 4 सामन्यांची हरण्याची मालिका थांबवली आहे. मुंबईच्या संघाला गुजरातविरुद्धच्या सामन्यात 'परफेक्ट कॉम्बिनेशन'सापडलं, पण विल जॅक्स मुंबईच्या संघात जोडला गेला आहे. मुंबई त्याला संघात समाविष्ट करतील पण कोणाच्या जागी ? क्विंटन डी कॉक, शेरफन रदरफोर्ड, मिचेल सँटनर आणि अल्लाह घझनफर यापैकी कोणाला संघातून वगळणार ? क्विंटन डी कॉक यष्टीरक्षक आहे, रदरफोर्डवर मुंबईचा मध्यक्रम अवलंबून आहे. मिचेल सँटनर अष्टपैलू खेळाडू आहे आणि पॉवरप्लेपासून डेथ ओव्हर्सपर्यंत कुठेही तो गोलंदाजी करू शकतो तर अल्लाह घझनफर 'मिस्ट्री स्पिनर' आहे जी क्रिकेटमध्ये दुर्मिळ कला आहे आणि त्याने बुमराहपेक्षा चांगली गोलंदाजी केली आहे.
विल जॅक्ससाठी मुंबई कोणत्या खेळाडूचा बळी देईल ? विल जॅक्सच्या येण्याने मुंबईचा बॅलन्स हलणार की मुंबईला अनेक चांगले खेळाडू निवडायचं 'स्वीट हेडएक' अनुभवायला मिळणार हे बघण्यासारखं असेल. मुंबईच्या गोलंदाजीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती या सामन्यातदेखील त्याची पुनरावृत्ती करावी अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.
चेन्नई जसे जसे सामने हरत आहेत तसतसा ऋतुराज गायकवाडवर दबाव वाढत आहे. संजू सॅमसन संघात असूनदेखील ऋतुराज संघाचा कर्णधार आहे त्यात ऋतुराजची कामगिरी खराब आहे. संघाची कामगिरीदेखील खराब आहे. धोनीच्या संघात खेळण्याने काय फरक पडणार आहे का ? धोनीचं मैदानात असणं चेन्नईचा आत्मविश्वास वाढवेल अशी अपेक्षा आपण बाळगू शकतो. चेन्नईकडून अंशुल कंबोजने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 13 विकेट्स घेतल्या आहेत. तो मुंबईसाठीदेखील खेळला आहे, त्यामुळे मुंबईसोबत कशी कामगिरी करेल हे बघण्याजोगं राहील.
महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्माच्या संघात असण्याने दोन्ही संघांना बळ मिळेल. दोघांचा अनुभव कामी दोन्ही संघांना कमी येईल. आयपीएलमधील सर्वात यीस्ट यशस्वी कर्णधार आमनेसामने आहेत म्हणजे सामना चांगला होईल अशी अपेक्षा असेल. वानखेडेच्या मैदानात कोणता संघ यश चाखेल ? मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्स ? याकडे सर्वांचंच लक्ष राहील