Chhatrapati Sambhajinagar Airport: संभाजीनगरच्या विमानसेवेला पुन्हा धक्का; दर रविवारी इंडिगोची विमानफेरी रद्द, नेमकं कारण काय?

छत्रपती संभाजीनगर शहरात औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार होत असताना शहराची हवाई कनेक्टिव्हिटी मात्र कमी होत असल्याचे चित्र आहे.

Chhatrapati Sambhajinagar Airport: संभाजीनगरच्या विमानसेवेला पुन्हा धक्का; दर रविवारी इंडिगोची विमानफेरी रद्द, नेमकं कारण काय?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार होत असताना शहराची हवाई कनेक्टिव्हिटी मात्र कमी होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी हैदराबाद आणि गोवा विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे, तर बेंगळुरूची विमानसेवाही आठवड्यातील चार दिवसांवरून तीन दिवस करण्यात आली आहे. आता छत्रपती संभाजीनगरहून नवी मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानसेवेवरही फेऱ्या कमी करण्याची वेळ आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, इंडिगोने सप्टेंबर महिन्यात 1 ते 30 सप्टेंबरदरम्यान दर रविवारी या मार्गावरील विमानसेवा ऑपरेशनल कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. मुंबईची विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवल्यानंतर या मार्गाला प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले होते.

हेही वाचा: Palghar Crime : आधी प्रियकरासोबत फिरायला गेली, दोन दिवसांनी मृत्यू; पालघरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय झालं?

मात्र, प्रवासीसंख्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने फेऱ्यांमध्ये कपात केली जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. औद्योगिक विकासाबरोबरच व्यावसायिक प्रवास, पर्यटन आणि रोजगाराच्या दृष्टीनेही विमानसेवा महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत उपलब्ध विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांकडून चिंता व्यक्त होऊ शकते.

विमान कंपन्यांच्या दृष्टीने प्रवासीसंख्या हा फेऱ्या निश्चित करण्यातील महत्त्वाचा घटक असला, तरी प्रवाशांना सोयीचे वेळापत्रक आणि चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली तर हवाई प्रवासाला प्रतिसाद वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे विमान कंपन्या, विमानतळ प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

हेही वाचा: Farmers Protest : सरकार आंदोलन दडपतयं? महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; शेतकरी संघटनेच्या राजीव कसबेंसह शेकडो शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

रविवारची सेवा रद्द झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटी प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शहराचा औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, विमानसेवा कमी होण्याऐवजी नव्या मार्गांवर सेवा सुरू करण्याबरोबरच विद्यमान मार्गांवरील फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विकासाला वेग देण्यासाठी मजबूत हवाई कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची गरज बनली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number