युक्रेनमध्ये अडकलेल्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताचे ‘मिशन एअरलिफ्ट’

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा तीढा कायम असून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकली आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राचे अथक प्रयत्न सुरू आहे. यासाठी भारत सरकारचे ‘मिशन एअरलिफ्ट’ सुरू करण्यात येणार आहे. या मिशननुसार, एअर इंडियाचे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकार एअरलिफ्ट […]

युक्रेनमध्ये अडकलेल्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताचे ‘मिशन एअरलिफ्ट’

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा तीढा कायम असून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकली आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राचे अथक प्रयत्न सुरू आहे. यासाठी भारत सरकारचे ‘मिशन एअरलिफ्ट’ सुरू करण्यात येणार आहे. या मिशननुसार, एअर इंडियाचे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत सरकार एअरलिफ्ट मिशननुसार, एअर इंडियाचे दोन विमान युक्रेनमध्ये पाठवणार आहे. एक विमान मुंबईतून आणि एक विमान दिल्लीतून पाठवण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या मार्गाने भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात येणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. भारत सरकारच्या एअरलिफ्ट मिशननुसार युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी लवकरच मायदेशी परतणार आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी युक्रेनमधून रवाना

रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी रवाना झाली आहे. रोमानियाची राजधानी बुचारेस्ट येथे या विद्यार्थ्यांना सोडण्यात येणार आहे. येथे पोहोचण्यासाठी या विद्यार्थ्यांना ७ ते ९ तास लागण्याची शक्यता आहे. युक्रेन परराष्ट्र मंत्रालयाने सुरू केलेले नियंत्रण कक्ष पश्चिम युक्रेनमधील लुईव्ह आणि चेर्नीव्हिटसी येथे कार्यान्वित झाले आहेत. दरम्यान, रोमानियात आलेल्या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया पहाटे दोन वाजता दोन विमाने रोमानियाची राजधानी बुचारेस्ट येथे पाठवणार आहे.

‘युद्ध नको, शांतत हवी’

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम आहे. मात्र, ‘युद्ध नको, शांतता हवी’ यासाठी रशियात जागोजागी मोर्चे निघाले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर रशियातील सेंट पीटर्सबर्ग, मास्कोमध्ये युद्धाच्या विरोधात हजारो रशियन नागिरक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=qyTzHfLGrs0

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number