India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी! दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षी याच तिमाहीतील 5.6 टक्के वाढीच्या तुलनेत ही मोठी झेप मानली जात आहे. याचबरोबर, नाममात्र GDP मध्येही 8.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
India GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी! दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांची वाढ

India GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा जगासमोर आपली ताकद सिद्ध केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2) भारताचा वास्तविक GDP तब्बल 8.2 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीतील 5.6 टक्के वाढीच्या तुलनेत ही मोठी झेप मानली जात आहे. याचबरोबर, नाममात्र GDP मध्येही 8.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या दमदार कामगिरीमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे.

हेही वाचा – Bihar Jeevika Didi scheme : महिला रोजगारासाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल; महिलांच्या खात्यात जमा होणार 10,000 रूपये

सरकारी आकडेवारीनुसार, GDP वाढीमध्ये दुय्यम आणि तृतीयक क्षेत्राचा मोठा वाटा आहे:

दुय्यम क्षेत्र: वाढ 8.1 टक्के
उत्पादन क्षेत्र: 9.1 टक्के वाढ
बांधकाम क्षेत्र: 7.2 टक्के वाढ
तृतीयक क्षेत्र: वाढ 9.2 टक्के
वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांमध्ये तब्बल 10.2 टक्के वाढ
कृषी क्षेत्रात 3.5 टक्के वाढ  
वीज, वायू, पाणीपुरवठा क्षेत्रात 4.4 टक्के वाढ 

हेही वाचा – Rapido Driver News : रॅपिडो चालकाच्या खात्यात 331 कोटी रुपये; उदयपूरमध्ये अलिशान लग्न, पाण्यासारखा वाहिला पैसा पण…

तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण मागणीतील सुधारणा आणि सरकारी खर्च वाढणे हे वाढीचे मुख्य घटक आहेत. मात्र, खाजगी कॉर्पोरेट गुंतवणूक तुलनेने मंदावलेली दिसते. भारताची अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही आपली वाढ कायम राखत आहे. उत्पादन, बांधकाम, वित्तीय सेवा आणि ग्रामीण बाजारातील सुधारणा लक्षात घेता आगामी तिमाहींतही वाढीचा कल सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version