टोकियो : टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. १९९० नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पदकाच्या इतका जवळ गेला आहे. रविवारी पुरुष हॉकी संघाने ब्रिटनला पराभूत करत उपांत्या फेरीत स्थान मिळवल्यानंतर आज महिला संघाने तोडीस तोड कामगिरी केली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. उपांत्यापूर्व लढतीत तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त वर्चस्व राखले आहे.