Weather Alert: IMD चा महत्त्वाचा अलर्ट! पुढील काही तासांत वादळासह पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना धोका

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवसांत वादळी पाऊस गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा धोका वाढणार असून शेतकऱ्यांना कापणी लवकर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे

Weather Alert: IMD चा महत्त्वाचा अलर्ट! पुढील काही तासांत वादळासह पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना धोका

Weather Alert: देशभरातील हवामानात अचानक बदल होत असून अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे संकट पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज रात्रीपासून उत्तर भारतात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या वातावरणात ‘वेस्टर्न डिस्टरबन्स’ सक्रिय झाला असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होणार आहे. या हवामान प्रणालीमुळे आर्द्रता वाढून ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, अनेक भागांमध्ये अचानक मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा:MI v/s RR: राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! 'हा' महत्त्वाचा खेळाडू पुन्हा मैदानात उतरणार

दिल्ली-एनसीआरसह हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील काही भागात आज रात्री वादळी वारे आणि पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक, वीजपुरवठा आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

6 ते 9 एप्रिल या कालावधीत या हवामान बदलाचा प्रभाव आणखी वाढू शकतो. राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड तसेच उत्तर-पूर्वेकडील काही राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. देशाच्या मोठ्या भूभागावर या बदलाचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. सध्या गहू कापणीचा हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी पिके काढणीसाठी तयार आहेत. अशा परिस्थितीत पाऊस आणि गारपीट झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर कापणी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा: IIT Baba Marriage: अध्यात्माच्या वाटेवर चालणारे ‘IIT बाबा’ वाट चुकले की काय? थेट विवाहबंधनात अडकले; कोण आहे पत्नी?

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच अनेक भागांतील शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषतः राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये गव्हाच्या पिकांवर गारपीटीचा मोठा परिणाम झाला होता. आता पुन्हा त्याच स्वरूपाचे हवामान निर्माण होत असल्याने शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आहे.

हवामान तज्ञांच्या मते, पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहू शकते. त्यामुळे नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.आज रात्रीपासून सुरू होणारा पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, सर्वांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number