भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता कमी होताना दिसून येत आहे. भारताने अमेरिकेसोबत एक मोठा करार केला आहे. भारत आता अमेरिकेकडून एलपीजी खरेदी करण्याची तयारी करत आहे.आमच्या चुलींमध्ये अमेरिकेचा गॅस वापरला जाईल, अशी घोषणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी केली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी घोषणा केली की भारतीय सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेतून द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार केला आहे.
२०२६ पर्यंत दरवर्षी अंदाजे २.२ दशलक्ष टन एलपीजी आयात करण्यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार, भारताच्या वार्षिक आयातीपैकी अंदाजे १०% आयात अमेरिकेतून होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये पुरी यांनी लिहिले की, “एक ऐतिहासिक सुरुवात! जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या एलपीजी बाजारपेठांपैकी एक अमेरिकेत खुली झाली आहे”.
पुढे त्यांनी लिहिले की, “भारतातील लोकांना सुरक्षित आणि परवडणारा एलपीजी पुरवठा करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्ही आमच्या एलपीजी पुरवठ्यात विविधता आणत आहोत. या कराराअंतर्गत आयात २०२६ मध्ये सुरू होईल”. भारतातील सार्वजनिक तेल कंपन्यांनी आयातीसाठी अमेरिकन कंपन्यांसोबत हा करार केला आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, अमेरिकेने कर आकारणीच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यापूर्वी, व्यापार कराराचा भाग म्हणून अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवरचा आपला आग्रह सोडून दिल्याचे वृत्त समोर आले होते.
हेही वाचा – Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; मक्का ते मदीना जाणारी बस टँकरवर आदळली, 42 भारतीयांचा मृत्यू
भारतातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी संयुक्तपणे अमेरिकेसोबत हा एलपीजी करार केला आहे. एलपीजी हा तोच गॅस आहे जो स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये भरला जातो. या करारानुसार, २०२६ पर्यंत अमेरिकेतून २.२ दशलक्ष टन एलपीजी आयात केले जाईल. हा करार फक्त एका वर्षासाठी आहे.
A historic first! One of the largest and the world’s fastest growing LPG market opens up to the United States. In our endeavour to provide secure affordable supplies of LPG to the people of India, we have been diversifying our LPG sourcing. In a significant development,… — Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) November 17, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.