Ind Vs Pak: निर्लज्जपणाचा कळस! पाकिस्तानी संघ सामन्याची फी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना देणार

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की त्यांच्या संघाने मिळालेली सामना फी 7 मेच्या ऑपरेशननंतर मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबांना दिली जाईल.
Ind Vs Pak: निर्लज्जपणाचा कळस! पाकिस्तानी संघ सामन्याची फी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना देणार

Ind Vs Pak: आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की, त्यांच्या संघाने मिळालेली सामना फी 7 मेच्या ऑपरेशननंतर मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबांना दिली जाईल. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात, नागरिक मारले गेले नाहीत, तर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी, जैश प्रमुख मसूद अझहरचे कुटुंबीय आणि लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी मारले गेले. तीन दिवसांनंतर भारताने पाकिस्तानी हवाई तळावर हल्ला केला. यात लष्करी जवान आणि अधिकारी मारले गेले. याचा अर्थ सलमान अली आगा ज्यांना नागरिक म्हणत आहेत ते प्रत्यक्षात जैश आणि लष्कराचे दहशतवादी आणि दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंबीय होते.

हेही वाचा – Asia Cup 2025 Final : पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… "ऑपरेशन सिंदूर मैदानातही सुरूच"

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफपासून ते संघप्रमुख सलमान आगा पर्यंत अनेक नेत्यांनी भारतीय संघावर नाराजी व्यक्त केली. संरक्षणमंत्र्यांनी एक्सवर विधान करताना क्रिकेटच्या भावना आणि सांस्कृतिक संबंधांवर पडणाऱ्या परिणामांविषयी चिंता व्यक्त केली. सलमान आगा यांनीही भारतीय संघाच्या खेळावर तीव्र संताप नोंदवला आणि काही कारणांसाठी ते अमान्य असल्याचे सांगितले.

हेही वाचा – Asia Cup Final: दुबईत ड्रामा! पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली; BCCI करणार ICC मध्ये तक्रार

भारताच्या कारवाईत कोण मारले गेले?

उपलब्ध दाव्यांनुसार, भारताच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या मुख्य ठिकाणी अनेक जण ठार झाले, आणि या यादीत मसूद अझहर यांच्या जवळचे नातेवाईक किंवा जैशशी संलग्न व्यक्ती असल्याचे काही वृत्तांतात नमूद केले जाते. रिपोर्टनुसार त्या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचे काही सदस्य, त्यांचे काही नातेवाईक आणि संबंधित दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, सलमान आगा यांनी संघाच्या सामन्याचा आर्थिक फायदा या मृतांच्या कुटुंबांना देण्याची घोषणा केल्याने हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही तर अधिक व्यापक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचेही विश्लेषकांचे मत आहे. सलमान आगाच्या घोषणेनंतर निर्माण झालेले हे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावरून उठलेली राजकीय चर्चा अजूनही सुरु आहे. भारतीय- पाकिस्तानी संबंध आणि सीमापार सुरक्षा घडामोडींवरील अशा प्रकारच्या घोषणांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रभाव पडू शकतो, असंही तज्ञांचं मत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version