कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाच्या 3,038 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 711 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोरोना आकडेवारीनुसार, दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन आणि जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. […]

कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाच्या 3,038 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 711 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोरोना आकडेवारीनुसार, दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन आणि जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 30 हजार 901वर पोहचली आहे.

देशात कोरोनाना पुन्हा डोकं वर काढलं आहे. तर देशाच्या राजधानीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 521 रुग्ण आढळले आहेत. तसेच महाराष्ट्रात 711 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच इतर राज्यांमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्यमंत्रालयाची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची 3.038 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,47,29,284 झाली आहे. तर, कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,179 इतकी झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number