बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था अशी ओळख असलेल्या बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाची पथकं दाखल झाली आहेत. आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागानं सर्वेक्षण सुरु केल्याची माहिती आहे. बीबीसीच्या नवी दिल्ली आणि परिसरातील कार्यलयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागानं ही कारवाई प्राथमिक स्तरावरील असल्याचं म्हटलं आहे. बीबीसीकडून काही दिवसांपूर्वी ‘मोदी द इंडिया क्वेशन’ […]

बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था अशी ओळख असलेल्या बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाची पथकं दाखल झाली आहेत. आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागानं सर्वेक्षण सुरु केल्याची माहिती आहे. बीबीसीच्या नवी दिल्ली आणि परिसरातील कार्यलयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागानं ही कारवाई प्राथमिक स्तरावरील असल्याचं म्हटलं आहे. बीबीसीकडून काही दिवसांपूर्वी ‘मोदी द इंडिया क्वेशन’ ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करण्यात आली होती. या माहितीपटाचे पडसाद देशभरात उमटले होते. या पार्श्वभूमीवर आयकर विभाग बीबीसीच्या कार्यालयात दाखल झाल्यानं चर्चा सुरु आहेत.

दिल्लीसोबतच मुंबई बीकेसी येथील बीबीसी कार्यालयातही आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झालं आहे. या कार्यालयात बाहेरील व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली नाही. सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आयकर विभागाची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे.मुंबईतील बीकेसीच्या आवारात विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे. आणि त्याचवेळी आयकर विभागाचे कर्मचारी हजर राहून कारवाई करत आहेत.

मुंबई आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेली आयकर टीम दिल्लीची आहे. सध्या आयकर पथकाने बीबीसी कार्यालयात शोध सुरू केली आहे. सध्या बीबीसी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून आयकर विभागाला या कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. याच संदर्भाने ही झाडा झडती सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसीच्या खात्यांसंबंधीची माहिती आयकर विभागातर्फे खंगाळून काढली जात आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातील अनेक कंप्यूटर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number