Stray Dogs : कुत्र्यांपासून सावधान! तब्बल 134 नागरिकांनी रेबीजमुळे गमावला जीव; भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या सर्वाधिक घटना मुंबईत

नाशिक : राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 5 वर्षांत 47 लाख नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर 134 जणांचा रेबीज या आजारामुळे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिकच्या आंदोलनानंतर संपूर्ण राज्यातील डॉग बाईटच्या उच्छादाची चर्चा सर्वत्र होत आहे. महाराष्ट्रात 2021 ते 2025 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 47 लाख 37 हजार 763 नागरिकांना […]

Stray Dogs : कुत्र्यांपासून सावधान! तब्बल 134 नागरिकांनी रेबीजमुळे गमावला जीव; भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या सर्वाधिक घटना मुंबईत

नाशिक : राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 5 वर्षांत 47 लाख नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर 134 जणांचा रेबीज या आजारामुळे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिकच्या आंदोलनानंतर संपूर्ण राज्यातील डॉग बाईटच्या उच्छादाची चर्चा सर्वत्र होत आहे. महाराष्ट्रात 2021 ते 2025 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 47 लाख 37 हजार 763 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली असून कुत्र्यांसह मांजर आणि माकडांच्या चाव्यामुळे राज्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल 134 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये मुंबईत सर्वाधिक 5 लाख 29 हजार 650 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे माहिती अधिकारातून समोर आली आहे. कुत्र्यांव्यतिरिक्त राज्यात 4 लाख 66 हजार 392 नागरिकांना मांजराने, तर 43 हजार 955 नागरिकांना माकडाने चावा घेतल्याने नागरिक जखमी झाले आहेत.  माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांनी शासनाकडे अर्ज करून ही अत्यंत संवेदनशील आकडेवारी मिळवली असल्याचे समजते.

हेही वाचा : Maharashtra Board: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला पेपर कधी?

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव या मुद्द्यावरून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन भटक्या कुत्र्यांची पिल्ले थेट नगर पंचायतीच्या कार्यालयात आणली होती. ते कुत्रे त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडली. या घटनेच्या नाट्यमय दृश्यांमध्ये, शिवसेनाची युवा शाखा असलेल्या 'युवा सेने'चे जिल्हा प्रमुख विक्रम रंधवे हे निफाड येथील नगर पंचायत कार्यालयात मुख्य अधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलावर ती पिल्ले सोडली. भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार केलेल्या तक्रारींवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ कामगारांनी हे आंदोलन केले होते. कार्यालयात आणण्यापूर्वी त्या पिल्लांना लहान पोत्यांमध्ये ठेवण्यात आले होते. पोत्यातून बाहेर काढल्यावर ती पिल्ले बावरलेल्या अवस्थेत टेबलावर इकडे-तिकडे धावताना आणि त्या अनोळखी परिसराचे निरीक्षण करताना दिसत होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number