दहावीच्या परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट

दहावी बोर्डाच्या परीक्षेला २ मार्च पासून सुरुवात झाली असून, यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. दहावी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. शाळेच्या इमारतीवर चढून वर्गाच्या खिडकीतून मुलं कॉपी पुरवत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला […]

दहावीच्या परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट

दहावी बोर्डाच्या परीक्षेला २ मार्च पासून सुरुवात झाली असून, यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. दहावी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. शाळेच्या इमारतीवर चढून वर्गाच्या खिडकीतून मुलं कॉपी पुरवत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे.

दरम्यान गुरुवारपासून सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेत कॉपी सारखे प्रकार घडू नयेत म्हणून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठ पथक तैनात करण्यात आले आहे. सोबतच शाळेच्या बाहेरून कॉपी पुरवली जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मात्र असे असताना पैठणमध्ये बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचे पाहायला मिळाले. तर या ठिकाणी लहान मुलं देखील कॉपी पुरवण्यासाठी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील अशाप्रकारे सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचे दिसून आले.

बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागातून तब्बल १ लाख ८० हजार २१० विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. ज्यात २ हजार ६१४ शाळांतील ९९ हजार ५४९ विद्यार्थी तसेच ८० हजार ६६१ विद्यार्थिनीचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २२७ परीक्षा केंद्रावर एकूण ६४ हजार ५९३ विद्यार्थी परीक्षा देत असून, बीडमध्ये १५६ केंद्रावर एकूण ४१ हजार ५२१, जालना जिल्ह्यातील ९३ परीक्षा केंद्रावर २७ हजार ८००, परभणीत १०० परीक्षा केंद्रावर ३० हजार ६७६ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रावर १५ हजार ६२० विद्यार्थी परीक्षा देत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number