सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . तर दुसरीकडे निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावाचा संपर्क तुटला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथील तिलारी नदी ,कुडाळ येथील कर्ली नदी,  खारेपाटण येथील वाघोटन नदी, कणकवली येथील गड नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिथिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत असल्याने […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . तर दुसरीकडे निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावाचा संपर्क तुटला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथील तिलारी नदी ,कुडाळ येथील कर्ली नदी,  खारेपाटण येथील वाघोटन नदी, कणकवली येथील गड नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिथिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पाऊसामुळे जवळजवळ २७ गावाचा संपर्क तुटला आहे .

वेंगुर्ला सावंतवाडी राज्यमार्गावरील तळवडा नदीला पूर आल्याने राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . खारेपाटण व तळवडा या ठिकाणी पुराचे पाणी बाजारपेठेत गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

Sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ गावांचा संपर्क तुटला | Marathi News

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number