गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशातच यावल तालुक्यातील परसाडे येथे एका लग्न समारंभात अचानक चक्रीवादळ आल्याने मंडप उडाले. यावेळी सलीम तडवी यांच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान मंडपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान परिसरात कुठेही वादळ नव्हते मात्र अचानक या गावात वादळ आल्याने टाकलेला मंडप उडाला, मंडप सावरताना अनेक युवकांनी आपल्या सहकार्यासह मंडप आवरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मंडप सावरत असताना एक युवक सुद्धा त्या मंडपाला लटकलेले दिसून येत होता. या घटने वेळी सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही मंडप टाकताना दक्षता बाळगावी व मंडप योग्य पद्धतीने टाकावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.