नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हसीना शेख साहिल शहा आणि मोईन शहा या दोघांनी मिळून वसंत गोरखनाथ सातपुते यांची हत्या केली.
मृत वसंत गोरखनाथ सातपुते (40, रा. स्वाराज्यनगर, पाथर्डी फाटा) हे गेल्या 15 ते 16 वर्षांपासून आरोपी हसीना हबीब शेख (वय ४४) हिच्यासोबत स्वराज्यानगर परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. मात्र 5 ऑगस्टपासून बेपत्ता झाले होते. आरोपी महिला हसीना शेख साहिल शहा हिने मोईन शहा याच्यासोबत कट रचून वसंत गोरखनाथ सातपुते यांना संपवल्याचे तपासात समोर आले.
तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तब्बल 18 तास मृतदेह घरात ठेवला होता. त्यानंतर मध्यरात्री मृतदेह कारमधून कसारा घाटात नेऊन मृतदेह फेकल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने कसारा घाटातून मृतदेह शोधला. मद्य-जुगाराच्या नाद असल्याने याच कारणातून हसीना हबीब शेखने मोईन शहाच्या मदतीने वसंतसातपुते यांचा काटा काढल्याचा पोलिसांचा संशय आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश करत संशयित महिला हसीना शेख साहिल शहा आणि मोईन शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेहाची विल्हेवाट लावणारे दोन साथीदार अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.