Farmers Protest : सरकार आंदोलन दडपतयं? महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; शेतकरी संघटनेच्या राजीव कसबेंसह शेकडो शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

लातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या, गुरुवारी मुंबईत होणाऱ्या शासकीय बंगले आणि मंत्र्यांच्या गाड्यांचा जाहीर लिलाव आंदोलनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांना लातूर-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या शेकडो […]

Farmers Protest : सरकार आंदोलन दडपतयं? महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या; शेतकरी संघटनेच्या राजीव कसबेंसह शेकडो शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

लातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, या प्रमुख मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या, गुरुवारी मुंबईत होणाऱ्या शासकीय बंगले आणि मंत्र्यांच्या गाड्यांचा जाहीर लिलाव आंदोलनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांना लातूर-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. त्यामुळे लातूर-सोलापूर महामार्गावरच शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या मुंबईत होणारे हे आंदोलन सरकारने दडपण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी दिला आहे. 

हेही वाचा : Baramati News : रोहित पवारांच्या PA ची अल्पवयीन मुलगी, नको ते करून बसली; बारामती पोलिसांनी सांगितलं, 3 मिनिटांत नेमकं काय घडलं?

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number