Jalgaon News : ‘फटाका’ सायलेन्सरवर फिरला बुलडोझर, अनेक सायलेन्सर जप्त; जळगाव पोलिसांची कारवाई

जुगल पाटील, प्रतिनिधी  जळगाव : जळगाव शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष मोहिमेदरम्यान नियमबाह्य आणि मोठा आवाज करणारे बुलेटचे सायलेन्सर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या सायलेन्सरवर थेट रोडरोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. […]

Jalgaon News : ‘फटाका’ सायलेन्सरवर फिरला बुलडोझर, अनेक सायलेन्सर जप्त; जळगाव पोलिसांची कारवाई

जुगल पाटील, प्रतिनिधी 

जळगाव : जळगाव शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष मोहिमेदरम्यान नियमबाह्य आणि मोठा आवाज करणारे बुलेटचे सायलेन्सर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या सायलेन्सरवर थेट रोडरोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. त्यामुळे बुलेटला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्यांचे आता चांगलेच टेन्शन वाढले आहे.

हेही वाचा : Mazgaoncha Morya Aagman : बाप्पाचा आगमन सोहळा! मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांवर अंडीफेक; अखेर 36 तासांनंतर आरोपी अटकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number