Crime News : जुन्या आर्थिक वादातून आतेभावांचा राग अनावर; मामेभावाच्या डोक्यावर लोखंडी हातोड्यानं सपासप वार, तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या आर्थिक वादातून 32 वर्षीय तरुणाची भररस्त्यात लोखंडी हातोडी आणि लाकडी दांड्याने डोक्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल नाक्याजवळील मदनी चौकात ही धक्कादायक घटना घडली. फरेस बिन अब्दुल अजिज अलकसेरी असे मृत तरुणाचे नाव आहे. फरेस हा पडेगाव परिसरात कुटुंबासह […]

Crime News : जुन्या आर्थिक वादातून आतेभावांचा राग अनावर; मामेभावाच्या डोक्यावर लोखंडी हातोड्यानं सपासप वार, तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या आर्थिक वादातून 32 वर्षीय तरुणाची भररस्त्यात लोखंडी हातोडी आणि लाकडी दांड्याने डोक्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल नाक्याजवळील मदनी चौकात ही धक्कादायक घटना घडली. फरेस बिन अब्दुल अजिज अलकसेरी असे मृत तरुणाचे नाव आहे. फरेस हा पडेगाव परिसरात कुटुंबासह राहत होता. कामानिमित्त मित्रासोबत मदनी चौकात आलेला असताना त्याचे आरोपी आतेभाऊ अहमद खलील बादाम आणि अदनान खलील बादाम यांच्यासोबत जुन्या आर्थिक वादातून भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर अहमद बादाम याने लोखंडी हातोडीने फरेसच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. वार चुकवताना फरेसच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपी भावांना काही तासांतच अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Petrol Diesel Prices Hike : अमेरिका-इराणमधील युद्धाचा कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम; पेट्रोल – डिझेलचे दर पुन्हा भडकले

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number