Malegaon Kutta Pills Seizure : मालेगावात नशेखोरीचा साठा! ‘कुत्ता’ गोळी विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई; कफ सिरपच्या 1,200 बाटल्या, तर 67 हजार गोळ्या जप्त

मालेगाव : मालेगाव शहरात नशाकारक कुत्ता गोळ्या आणि कफ सिरप औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मालेगाव शहरातील काळी कुठी मैदान परिसरात पोलिसांनी छापा टाकत 6 लाख 35 हजार 879 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कोडीनयुक्त कफ सिरपच्या 1200 बाटल्या, तसेच अल्प्राझोलमच्या तब्बल 67 हजार 200 कुत्ता गोळ्यांचा समावेश आहे. या कारवाईत तीन आरोपी […]

Malegaon Kutta Pills Seizure : मालेगावात नशेखोरीचा साठा! ‘कुत्ता’ गोळी विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई; कफ सिरपच्या 1,200 बाटल्या, तर 67 हजार गोळ्या जप्त

मालेगाव : मालेगाव शहरात नशाकारक कुत्ता गोळ्या आणि कफ सिरप औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मालेगाव शहरातील काळी कुठी मैदान परिसरात पोलिसांनी छापा टाकत 6 लाख 35 हजार 879 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कोडीनयुक्त कफ सिरपच्या 1200 बाटल्या, तसेच अल्प्राझोलमच्या तब्बल 67 हजार 200 कुत्ता गोळ्यांचा समावेश आहे. या कारवाईत तीन आरोपी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. सुरतहून मालेगावात आणून नशाकारक औषधांचा साठा आणि विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर 20 ऑगस्टच्या रात्रीपासून 21 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यामधील एका आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मालेगावचे अप्पर पोली अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी दिली. 

हेही वाचा : Gold-Silver Rate : सणासुदीच्या काळात चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक! चांदीच्या दरात 10 हजारांची उसळी, तर सोन्याचे दर 6 हजारांनी…

काय आहे कुत्ता गोळी?

औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला, तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून, त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधिर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते, तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला ‘कुत्ता गोळी’ असे म्हटले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो. निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते. या नियंत्रणहीन झालेल्या व्यक्तीच्या भावना भडकल्यास ती कोणतेही कृत्य करण्यास उद्युक्त होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number