‘बारसूतील लोकांना विश्वासात घेतल्यास विरोध दूर होईल’

जिल्ह्यातील बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र त्याला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सर्व साहित्यासह सर्वेक्षण करणारे पथक आज सकाळी पोहोचले. मात्र त्याआधीच विरोध करणाऱ्यांनी रस्त्यावर झोपून पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जर काजू-आंब्याच्या बागांवर त्याचा परिणाम होणार असेल तर आम्ही देखील त्याला विरोध करू, […]

‘बारसूतील लोकांना विश्वासात घेतल्यास विरोध दूर होईल’

जिल्ह्यातील बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र त्याला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सर्व साहित्यासह सर्वेक्षण करणारे पथक आज सकाळी पोहोचले. मात्र त्याआधीच विरोध करणाऱ्यांनी रस्त्यावर झोपून पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जर काजू-आंब्याच्या बागांवर त्याचा परिणाम होणार असेल तर आम्ही देखील त्याला विरोध करू, असे मोठे विधान शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.

दिपक केसरकर यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “रिफायनरीमुळे हजारो लोकांना नोकऱ्या मिळतील. परंतु विरोध करायचा असेल तर आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले पाहिजे. गाडीच्या समोर झोपून पथकाला अडवणे हा आंदोलनाचा प्रकार होऊ शकत नाही. त्याच्यामधून एखाद्याचा जीव जावू शकतो. शेवटी जीव फार मोठा असतो. त्यामुळे आता जे काही मी तुम्हाला सांगितले त्याबाबत अधिक माहिती गोळा करून कशी प्रदर्शित करता येईल, हा माझा प्रयत्न असेल.

पुढे केसरकर म्हणाले,” जेव्हा एन्रॉन प्रकल्प कोकणात येत होता तेव्हादेखील स्थानिकांकडून त्या प्रकल्पाला विरोध झाला होता. परंतु एन्रॉन आल्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. बारसूतल्या प्रकल्पाच्या बाबतीत देखील तसंच होणार असेल, तिथली शेती आणि मासेमारीवर परिणाम होणार नसेल तर ती माहिती जनतेसमोर येण्याची गरज आहे. या लोकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यासंदर्भात मी कारवाई देखील करणार असल्याचे,” दिपक केसरकर यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number