आशा भोसलेंच्या निधनानंतर हृदयनाथ मंगेशकरांनी केली मोठी घोषणा; लता मंगेशकर हॉस्पिटलच्या नावात होणार बदल, आता….

त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 
आशा भोसलेंच्या निधनानंतर हृदयनाथ मंगेशकरांनी केली मोठी घोषणा;  लता मंगेशकर हॉस्पिटलच्या नावात होणार बदल, आता….

भारतीय संगीत क्षेत्राचा जादुई आवाज आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर 7 दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.  आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सर्वांनीच त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 

 हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. मंगेशकर कुटुंबीयांकडून पुण्याजवळ उभारल्या जाणाऱ्या भव्य हॉस्पिटलसंदर्भात हृदयनाथ मंगेशकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आधी या हॉस्पिलटले नियोजित नाव लता मंगेशकर हॉस्पिटल असं होतं. 

हेही वाचा –Asha Bhosle Death: मंगेशकर कुटुंबात मोठी घडामोड; आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर हृदयनाथ मंगेशकर पुण्यातून करणार मोठी घोषणा 

16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा –Asha Bhosle Late Rites : …आणि शेवटी त्यांनी रडवलंच; गानसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार 

या हॉस्पिटलला आधी केवळ लता मंगेशकर यांचं नाव देण्याचा निर्णय झाला होता. मात्र आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थेचं नाव आता 'लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' असं ठेवण्यात येणार असल्याची माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version