होय, मी भंगारवाला आणि भंगाराचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही – नवाब मलिक

  भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यावर, ‘माझी १०० कोटींची पात्रता तरी आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान असल्याचे’ मलिक म्हणाले.   ‘होय, मी भंगारवाला आहे. यांना भंगारवाल्याची किमया […]

होय, मी भंगारवाला आणि भंगाराचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही – नवाब मलिक

  भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यावर, ‘माझी १०० कोटींची पात्रता तरी आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान असल्याचे’ मलिक म्हणाले.

  ‘होय, मी भंगारवाला आहे. यांना भंगारवाल्याची किमया माहीत नाही. भंगरवाला निरुपयोगी गोष्टी जमा करतो. भंगाराचे तुकडे करतो आणि मग ते भट्टीत टाकून त्याचे पाणी पाणी करतो. या शहरातील सर्व भंगारांचे तुकडे करून भट्टीत टाकून त्याचे पाणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही,’ असे म्हणत मलिकांनी भाजपला इशारा दिला आहे.

  ‘माझ्यावर सोने तस्करीचे आरोप झाले नाहीत. तसेच माझ्यावर ईडीची धाडही पडली नाही. मुख्यमंत्री निधीत जमा असलेला चेकसुद्धा बाऊन्स झाला नाही, असे म्हणत मलिकांनी मोहित कंबोज यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number