Hingoli: खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी; हिंगोलीत खळबळ

हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Hingoli: खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी; हिंगोलीत खळबळ

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. कर्तव्यावर असताना खाकी वर्दी परिधान केलेल्या अवस्थेत हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. या प्रकरणाचा नेमका तपास सुरू असून, आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अधिकारी अमोल गंगलवाड (वय 50) हे हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहरातील खटकाळी बायपासजवळील रेल्वे रुळांवर ही घटना घडली. पूर्णा येथून अकोल्याकडे जाणारी रेल्वे येण्याची प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी अचानक रेल्वेसमोर झेप घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा : Chandwad Accident: चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! ट्रकने 6 ते 7 वाहनांना चिरडलं; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

धावत्या रेल्वेची धडक बसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. रेल्वे चालकाने ही घटना पाहिल्यानंतर तत्काळ रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर रेल्वे स्थानक प्रशासनाने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी रवाना केली.

घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

अमोल गंगलवाड यांची अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच परभणी जिल्हा पोलीस दलातून हिंगोली येथे बदली झाली होती. सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ते शांत स्वभावाचे, मनमिळाऊ आणि जबाबदारीने काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Jalgaon: ‘हॅपी रक्षाबंधन ताई… मम्मी-पप्पांना एकटं सोडू नकोस’ स्टेटस ठेवून भावाने रक्षाबंधनाच्या दिवशीच संपवलं जीवन, जळगाव हादरलं

प्राथमिक तपासादरम्यान घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्याच्या विविध पैलूंचा तपास केला जात असून, सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number