बॉलिवूडप्रमाणेच देशभरातील अनेक क्षेत्रात सुरू असलेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेक धक्कादायक खुलासे आत्तापर्यंत समोर आले आहेत. अनेक पुरूषांनी महिलांसोबत केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आणि शोषणाच्या कहाण्या आता पीडित महिला जगासमोर मांडू लागल्या आहेत. या मोहिमेला अनेक लोक पाठिंबाही देत आहेत. मात्र यासंदर्भात अभिनेत्री हेमा मालिनी यांना प्रश्न विचारला असता यावर त्यांची प्रतिक्रिया धक्कादायक होती.
अभिनेते संजय खान यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना महिलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणासंदर्भातील ‘मी टू’ मोहिनेसंदर्भात विचारण्यात आलं. मात्र यावेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अनपेक्षित होती. या गंभीर मुद्द्याबद्दल त्यांना विचारलं असता ‘महिलांबाबत होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबतची कोणतीच घटना मला धक्कादायक वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया देत हेमा मालिनी हसायला लागल्या. महिलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आता महिला वाचा फोडू लागल्या असताना भाजप खासदार असणाऱ्या हेमा मालिनी यांनी अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
यापूर्वी एका कार्यक्रमात महिलांनी आसपासच्या नकारात्मक गोष्टी लक्षात स्वसंरक्षण करायलं हवं, असं विधान हेमा मालिनी केलं होतं. महिलांच्या अनेक प्रश्नांबद्दल हेमा मालिनी यांनी आवाज उठवला आहे. मात्र एकेकाळी बॉलिवूडमध्ये ‘ड्रीम गर्ल’ बनून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या हेमा मालिनी आज बॉलिवूडमध्ये लैंगिक अत्याचारांचा सामना करणाऱ्य़ा अभिनेत्रींच्या ‘मी टू’ मोहिमेला हसण्यावारी नेतात, तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
संबंधित बातम्या-
#MeToo गुगलने 48 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता
#MeToo दिबाकर बॅनर्जीने मला करायला सांगितलं ‘हे’!… पायल रोहतगीचा आरोप!
#MeTooचा दंगा… तनुश्रीचा आता राखी सावंतशी पंगा!
#METOO मोहिमेबद्दल सिंधूताईंची प्रतिक्रिया…
#METOO: पुण्यातील सिंबायोसिमधल्या प्राध्यापकांवर आरोप
#METOO: अन्नू मलिकची ‘इंडियन आयडॉल’ मधून हकालपट्टी
#MeToo मोहिमेचा गैरवापर करु नका – उच्च न्यायालय
#MeToo एम.जे. अकबर यांचा अखेर राजीनामा
#MeToo ‘सत्य हीच माझी ताकत आहे’, प्रिया रमाणी यांचं आकबरांना उत्तर
#METOO:नुकसान भरपाईसाठी आलोकनाथने मागितली ‘एवढी’ रक्कम!
#MeToo : “उद्या मोदींवरही आरोप होतील, तेव्हा काय कराल?”
#MeToo मोहिमेअंतर्गंत ‘या’ महिलांनी घेतला महत्वाचा निर्णय
#MeToo दिग्दर्शक सुभाष घईंवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप
#MeToo तनुश्रीने नाना पाटेकरांसह ‘या’ 3 जणांच्या नार्को टेस्टची केली मागणी
#MeToo मोहीमेत बिग बींचं नावही समोर येणार?
#MeToo आता बॉलिवूडच्या ‘या’ दिग्दर्शकावरही गंभीर आरोप
आता या महिलेनेच केला दुसऱ्या महिलेवर #MeToo द्वारे आरोप!
#MeToo आता बॉलिवूडच्या या ‘शोमॅन’वर बलात्काराचा आरोप!
#METOO मोहिमेला आमीर खानचा ‘असा’ पाठिंबा