जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
नववर्ष साजरं करायला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी 29 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात.
अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड गर्दीचा, ट्रॅफिक जामचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवस नो एन्ट्री असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.