वृत्तसंस्था, बंगळुरु
बंगळुरुतील तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर बर्फवृष्टी झाल्यासारखं चित्र पाहयला मिळत आहे. मात्र, ही बर्फवृष्टी नसून दूषित रसायनांमुळे तयार झालेला फेस आहे. हा फेस सध्या बंगळुरुतील रस्त्यांवर पसरला आहे.
मुसळधार पावसानंतर बंगळुरुतील रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. हा फेस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की रस्त्यावर पांढरे ढग उतरल्यासारखं वाटत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.