Weather Update : महाराष्ट्रात पावसाचे सावट कायम! पुढील 4 दिवस ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज जारी; IMDची नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना

गेल्या काही दिवसांत राज्यातील कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागाला पावसानं झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Weather Update : महाराष्ट्रात पावसाचे सावट कायम! पुढील 4 दिवस ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज जारी; IMDची नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना

गेल्या काही दिवसांत राज्यातील कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागाला पावसानं झोडपून काढलं आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील चार दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत हलक्या पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरासाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा या जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून 30 जुलैदरम्यान ताशी 40 ते 50 किमी आणि कमाल 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता कायम असल्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा- Ganpati Special Konkan Railway : चाकरमान्यांची प्रतीक्षा संपली! गणपतीसाठी कोकणात धावणार 246 विशेष गाड्या; बुकिंगपासून वेळापत्रकापर्यंत सर्व अपडेट

नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. नाशिक शहर आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. यावेळी गंगापूर धरणातून सध्या 4,947 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तसेच दारणा धरणातून देखील 2,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गोदावरी आणि दारणा नदीवरील पूर ओसरला असून गोदावरी आणि दारणा नदी पूर्वपदावर, नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

तर गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली होती. सध्या जिल्हाभरात रोवणीची कामे वेगाने सुरू असून या पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणीच्या कामांना आणखी गती मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number