Chiplun Bus Accident : भीषण अपघात! चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 30 ते 40 प्रवासी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिपळूणजवळील आंबडस परिसरातील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली असून, या अपघातात सुमारे 30 ते 40 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी […]

Chiplun Bus Accident : भीषण अपघात! चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 30 ते 40 प्रवासी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिपळूणजवळील आंबडस परिसरातील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली असून, या अपघातात सुमारे 30 ते 40 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी परिसरात एका वळणावर समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात अनेक प्रवाशांना दुखापत झाली असून काही प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती आहे. तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या धडकेत सुमारे 30 ते 40 प्रवासी जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आले असून, पोलीस अपघाताच्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : Pune Road Accident : भीषण अपघात! चाकणजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा वडिलांसह ट्रकखाली चिरडून मृत्यू; आई गंभीर जखमी

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number