गुणरत्न सदावर्तेंना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली. याप्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला असून गुणरत्न सदावर्ते यांना आणखी दोन दिवसांची म्हणजेच […]

गुणरत्न सदावर्तेंना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली. याप्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला असून गुणरत्न सदावर्ते यांना आणखी दोन दिवसांची म्हणजेच १३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

गिरगाव न्यायालयावर गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीवर सुनावणी पार पडली. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने वकील ऍड. गिरीश कुलकर्णी यांनी युक्तिवाद लढवला. तर वकील प्रदीप घरत यांनी सरकारी बाजू मांडली.

सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद

सदावर्तेंना ११ दिवसांची पोलीस कोठडी द्या.

सर्व बाजूंच्या तपासासाठी कोठडी गरजेची आहे.

पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित होता.

सदावर्तेंनी सिल्वर ओकवर पत्रकारांना पाठवण्यास सांगितले.

हल्ल्याच्या दिवशी सदावर्तेंना दोनदा नागपुरातून फोन आलेला.

जप्त केलेल्या मोबाईलमधून माहिती समोर आली.

पवारांच्या घरातील सीसीटीव्हीचा तपास सुरु आहे.

हल्ल्याआधी एक बैठक झाली.

गुणरत्न सदावर्ते यांचा दावा

पवारांच्या घरावरील आंदोलन म्हणजे कारस्थान नाही.

आंदोलक कोण होते हे साऱ्यांना ठाऊक आहे.

पोलिसांना हल्ल्याची कल्पना होती तर बंदोबस्त का नव्हता?

पैसे वसूल केले अशी आंदोलकांची तक्रार नाहीए.

आंदोलन वर्षभरापासून सुरू आहे.

नागपुरचा फोन हा हवेतला आरोप आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number