वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. मात्र मोदींच्याच गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात अनिश्चित काळासाठी बंद पुकारला आहे.
सुरतमध्ये कापड मार्केट बंद करुन व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली.
आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जीएसटी लागू करण्यासाठी सूरतचे व्यापारी तसेच सुरतमधल इतर व्यापारी पूर्वीपासूनच विरोध करत होते.
जीएसटी हटवून सोपी करप्रणाली आणावी अशी मागणी व्यापारी करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.