ताबडतोब कामावर रुजू व्हा नाहीतर… सरकारचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

ताबडतोब कामावर रुजू व्हा नाहीतर… सरकारचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि कृती समितीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय. ऐन दिवाळीत एसटीचा संप सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठीची आजची बैठकही निष्फळ ठरलीय.

मुंबई सेंट्रल एसटी महामंडळात नुकतीच परिवहन मंत्री दिवाकर रावते, परिवहन आयुक्त प्रविण गेडाम आणि एसटीचे अधिकारी यांची बैठक झाली. य़ा बैठकीतच सरकारनं हा इशारा दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version