SAIL MT Recruitment 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने देशभरातील विविध प्रकल्प, प्लांट्स आणि खाण विभागांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदांच्या 124 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये ही पदे उपलब्ध असून तातडीच्या गरजेनुसार ही भरती केली जात आहे.
अभियांत्रिकी शाखेनुसार जागांचे वितरण
या भरतीत सर्वाधिक संधी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी उमेदवारांसाठी असून एकूण 44 जागा उपलब्ध आहेत. मेकॅनिकलमध्ये 30, मेटलर्जीमध्ये 20, सिव्हिलमध्ये 14, तर कॉम्प्युटर अभियांत्रिकीमध्ये 4 पदे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, इंस्ट्रुमेंटेशनमध्ये 7 आणि केमिकल इंजिनीअरिंगमध्ये 5 जागा आहेत. आवश्यकतेनुसार जागांमध्ये बदल होऊ शकतो, अशी माहिती SAIL ने दिली आहे.
आरक्षणानुसार जागांची स्थिती
एकूण 124 पदांपैकी 35 जागा UR, 31 OBC (NCL), 22 SC, 18 ST आणि 18 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. याशिवाय सर्व शाखांमध्ये एकूण 7 PwBD पदे आरक्षित आहेत.
अधिकृत वेबसाईट: https://www.sail.co.in/en
वयोमर्यादा –
5 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षणानुसार वयोमर्यादेत पुढीलप्रमाणे सवलत आहे:
SC/ST – 5 वर्षे
OBC (NCL) – 3 वर्षे
PwBD – 10 ते 15 वर्षे
विभागीय कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित आहे.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेत
किमान 65 टक्के गुणांसह BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान गुणांची अट 55 टक्के ठेवण्यात आली आहे.
कॉम्प्युटर शाखेसाठी MCA (3 वर्षे) पदवी देखील ग्राह्य धरली जाईल.
इलेक्ट्रिकल शाखेत अनेक संबंधित उपशाखांना मान्यता देण्यात आली आहे.
वेतन आणि प्रशिक्षण
निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर त्यांची E1 ग्रेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती होईल.
– प्रशिक्षण काळातील प्रारंभिक पगार: 50,000 रुपये प्रतिमाह
– सहाय्यक व्यवस्थापक (E1) पगारश्रेणी: 60,000 – 1,80,000 रुपये
– एकूण वार्षिक CTC अंदाजे 16–17 लाख रुपये
– उमेदवारांना PF, ग्रॅच्युइटी, HRA, वैद्यकीय सुविधा यांसारखे सर्व लाभ लागू असतील.
निवड प्रक्रिया
SAIL च्या मते, निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल:
1) ऑनलाइन CBT परीक्षा (जानेवारी-फेब्रुवारी 2026)
डोमेन टेस्ट – 100 गुण (40 मिनिटे)
अभियोग्यता टेस्ट – 100 गुण (80 मिनिटे)
किमान पर्सेंटाइल:
UR/EWS – 50 पर्सेंटाइल
SC/ST/OBC/PwBD – 40 पर्सेंटाइल
अंतिम गुणांचे वेटेज:
CBT – 75 टक्के
GD – 10 टक्के
मुलाखत – 15 टक्के
हेही वाचा – Stenographer Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर भरती; 1.77 लाखांपर्यंत मिळणार पगार
अर्ज कसा करावा?
अर्ज फक्त ऑनलाइन www.sail.co.in किंवा www.sailcareers.com या वेबसाईटवरून स्वीकारले जातील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
वैध ईमेल आयडी
मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
स्वाक्षरी स्कॅन
अर्ज शुल्क:
GEN/OBC/EWS – 1050 रुपये
SC/ST/PwBD/ESM – 300 रुपये
या भरतीमुळे तांत्रिक शाखेतील अभियंत्यांसाठी SAIL मध्ये करिअरची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.