छत्रपती संभाजी नगरमधून अतिशय धक्कादायक तितकाच संतापनजक प्रकार समोर आलेला आहे. किलेअर्क परिसरात असलेल्या शासकीय वसतिगृहातील तब्बल 21 विद्यार्थी हे उपाशी राहिल्याचा आरोप करण्यात आलेला असून या सर्व विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण देण्यात आले नसल्याची तक्रार ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. वसतिगृहात राहत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण मिळणे हे अपेक्षित असतानाच हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आपली ही समस्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे.
हेही वाचा- Gold Silver Rate Today: चांदीचे दर वधारले तर सोन्याची किंमत घसरली, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे भाव
या घडलेल्या प्रकाराची योग्य चौकशी करुन सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना नियमितपणे वेळेवर जेवण मिळाले, अशी मागणी केली जात आहे. त्यासोबतच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि त्याची गुणवत्ताकडे ही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही सांगितले जात आहे. आता या तक्रारीवर प्रशासनानकडून काय कारवाई केली जाते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.