या रुग्णालयात झालाय 48 तासांत 30 बाळांचा मृत्यू

या रुग्णालयात झालाय 48 तासांत 30 बाळांचा मृत्यू

वृत्तसंस्था, गोरखपूर

उत्तरप्रदेशातील गोरखपूरच्या बाबा राघवदास रूग्णालयात मागील 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 पैकी 15 लहान मुले महिन्याभरापेक्षा कमी वयाची होती. तर इतर 15 पैकी 6 मुलांचे वय 1 महिन्यापेक्षा जास्त होते. बुधवार मध्यरात्र ते शुक्रवार मध्यरात्र या 48 तासांच्या कालवाधीत हे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केलंय.

उत्तर प्रदेशातील याच बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्ट महिन्यात मेंदूज्वर झालेल्या बाळांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडूनही या रूग्णालयाने काहीही धडा घेतला नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version