गणेशोत्सवात हमखास सुट्टी घेणारे चाकरमानी हे कन्फर्म तिकीट असो व नसो पण कोकणात पोहोचतातच. गणपतीच्या पहिल्या दिवशी का होईना वा दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी कोकणात विराजमान गणरायाचे दर्शन घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. पण कमी प्रमाणात असणाऱ्या लोकलमुळे गावी जायची संधी मुकते किंवा उशीर होतो.
त्यामुळे प्रवाशांच्या या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने कोकणासाठी अतिरिक्त 34 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान 4 आरक्षित विशेष गाड्या आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान 30 अनारक्षित (Unreserved) मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. यामुळे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे.
हेही वाचा- Passenger Disturbance in Flight: हजारो फूट उंचावर विमानात प्रवाशाचा हैदोस; मग काय… एअर होस्टेसने चिकटवून ठेवलं खुर्चीला!
या गाड्यांचे वेळापत्रक काय असेल?
लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ट्रेन (4 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01003 (LTT ते मडगाव): ही विशेष गाडी दिनांक 16 सप्टेंबर 2026 आणि 19 सप्टेंबर 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी 07:50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण 2 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01004 (मडगाव ते LTT): ही गाडी दिनांक 15 सप्टेंबर 2026 आणि 18 सप्टेंबर 2026 रोजी मडगाव येथून सायंकाळी 04:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण 2 फेऱ्या)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी
पनवेल – चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष ट्रेन (30 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01959 (पनवेल ते चिपळूण): ही मेमू अनारक्षित विशेष ट्रेन दिनांक 10 ते 14 सप्टेंबर 2026 आणि 18 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत पनवेल येथून दुपारी 03:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:20 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. (एकूण 15 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01960 (चिपळूण ते पनवेल): ही ट्रेन 10 ते 14 सप्टेंबर 2026 आणि 18 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान चिपळूण येथून सकाळी 09:00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 02:30 वाजता पनवेलला पोहोचेल. (एकूण 15 फेऱ्या)ही मेमू सेवा दिनांक 15, 16 आणि 17 सप्टेंबर 2026 या 3 दिवसांच्या कालावधीत चालवली जाणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
थांबे:पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.