अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर आता तात्पुरते का होईन युद्ध थांबले असून याचा परिणाम थेट सोने-चांदीच्या दरांवर झाला आहे.
हेही वाचा- Iran-US Tension: ‘इराणवरील हल्ला तूर्तास रद्द…’; मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावच्या सुवर्णनगरीवर सातत्याने परिणाम होत असून सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठा चढ-उतार होताना पहायला मिळत आहे. गुंतवणूकदार यांनी कच्च्या तेलाकडे गुंतवणूक केल्यामुळे तसेच रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे सातत्याने सोन्यामध्ये चढ-उतार होताना पहायला मिळत आहे. जळगावच्या बाजारात आज सोन्याचे दर हे जीएसटी सह 1 लाख 43 हजारावर जाऊन पोहोचले आहेत.
तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 16 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात सोन्याचे दर पाच हजार रुपयांनी घसरले तर चांदीचे दर 16 हजार रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे. ग्राहकांसाठी ही आनंददायी बाब असून सोन खरेदी करण्याची ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी ग्राहकांशी संवाद साधला आहे.